Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यू...

National Highway Accidents: राष्ट्रीय महामार्ग १६१ वर मध्यरात्री, खानापूर चित्ता जवळ, दोन स्विफ्ट डिझायर चालकांचा (सुरज साळवे व अरुण आमले) जागीचा मृत्यू झाला.


राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाची धडक दोघांचा जागीच मृत्यू

National Highway Accidents |

खानापूर चित्ता जवळील घटना

खानापूर चित्ता (National Highway Accidents) : हिंगोली ते कळमनुरी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या जड वाहनास स्विफ्ट डिझायर धडकल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  घडली.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता जवळील मोदी यांच्या शेताजवळ बिघाड झालेल्या ट्रेलरला पाठीमागून धडकल्याने कळमनुरी साईनगर येथील सुरज संजय साळवे व अरुण भिवाजी आमले हे दोघेजण जागीच ठार झाले. सदरील अपघात बिघाड झालेले वाहन धोकादायक स्थितीत असल्याने अपघात घडला असावा. कारण बिघाड झालेल्या ट्रेलरच्या बाजूला कोणतेही धोकादायक स्टीकर अथवा फलक लावण्यात आले नाहीत यामुळेच अपघात झाला असावा असे प्रत्यक्ष दर्शविणे सांगितले. सुरज आणि अरुण हे दोघेजण काही कामानिमित्त कळमनुरी वरून हिंगोलीला आपल्या स्विफ्ट डिझायर  कार क्रमांक एम एच 14 जीडी ९८७१ मध्ये काही कामानिमित्त गेले होते.

हिंगोली येथील कामे आटोपून परतीचा प्रवास कळमनुरी कडे करीत असताना खानापूर चित्ता जवळील मोदी यांच्या शेताजवळ मागील दोन तीन दिवसापासून नादुरुस्त  ( बिघाड ) झालेले अवजड वाहन ट्रेलर क्रमांक आर जे 51 जीए 0799 धोकादायक स्थितीमध्ये उभे करण्यात आले होते. बिघाड झालेल्या ट्रकच्या पाठीमागून राष्ट्रीय महामार्गाकडून अथवा ट्रेलर चालकांकडून कोणत्याही प्रकारचे धोकादायक स्टिकर अथवा बॅरिकेट लावण्यात आलेले नाहीत.

यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून चालणाऱ्या वाहन चालकांना समोर बिघाड झालेले वाहन दिसून आले नसल्याने, सदरील अपघात (National Highway Accidents) घडल्याचे प्रथम दर्शनी कडून सांगण्यात आले. अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला कळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, बीट अमलदार अनिल डुकरे व साथीदार यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या अपघातातील मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related to this topic: