Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Heavy Rain

पुराच्या पाण्यात कार वाहून गेली; झाडाला अडकल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्राण थोडक्यात बचावले

गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग तसेच नदी-नाल्यांवरील मार्ग पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.


पुराच्या पाण्यात कार वाहून गेली झाडाला अडकल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्राण थोडक्यात बचावले

आष्टी–मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावरील थरारक घटना; पोलीस, महसूल व वन विभागाच्या तत्परतेने सर्वांची सुखरूप सुटका

आष्टी (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग तसेच नदी-नाल्यांवरील मार्ग पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत आष्टी–मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर गुरुवारी एक थरारक घटना घडली.

वनपरिक्षेत्र अधिकारी अझरुद्दीन पठाण आपल्या कारसह नाल्यावरील पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना कारला पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा फटका बसला आणि वाहन वाहून गेले.

पुराच्या वेगवान प्रवाहात कार काही अंतरापर्यंत वाहत गेल्यानंतर ती एका झाडाला अडकली. त्यामुळे कारमधील व्यक्तींचे प्राण थोडक्यात बचावले. काही काळ कार पुराच्या पाण्यात झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेराव, महसूल विभाग तसेच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे व मोंढळे आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून 25 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.

Related to this topic: