Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हट्टा मृत्यु प्रकरण

हट्टा येथे दोन गटात वाद; एकाचा मृत्यु तीन गंभीर

Hatta death case: हट्टा येथे बाजार चौकातील खंडोबा मंदिराच्या समोर दोन गटांमध्ये मारहाण झाली. रुद्र प्रदिप दस्तके याचा चाकू लागल्याने मृत्यु झाला, तर इतर तीन जण गंभीर जखमी


हट्टा येथे दोन गटात वाद एकाचा मृत्यु तीन गंभीर

Hatta death case |

हट्टा (Hatta death case) : वसमत तालुक्यातील हट्टा येथील बाजार चौकातील खंडोबा मंदिरासमोर दोन गटात चाकु, लाठ्या व दगडाने मारहाण झाली यात रुद्र प्रदिप दस्तके (देशमुख) याचा चाकू लागल्याने त्याचा मृत्यु झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली असून जखमीवर परभणी येथे उपचार सुरु आहे. जखमी मध्ये प्रविण कोराजी देशमुख (दस्तके), प्रदिप कोराजी देशमुख (दस्तके), शुभम प्रसाद देशमुख (दस्तके) यांचा समावेश आहे त्यांना १०८ ने रात्री परभणी मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तीघेही गंभीर जखमी आहेत. 

तर दुसऱ्या गटातील प्रणव प्रल्हाद भवर, योगेश बाळासाहेब भवर, पंकज प्रल्हाद भवर, प्रल्हाद लक्षण भवर हे किरकोळ जखमी झाली यापूर्वी १७ मे रोजी पिंपळगाव (कुटे) येथील वाळुच्या घाटावर वाद झाला होता. दरम्यान याबाबत दोघांना परभणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले या संदर्भात गुन्हा मात्र दाखल न करता प्रकरण मिटले होते. त्याचे पर्यावसान रविवारी रात्री मारहाणीत झाले मयत रुद्र प्रदिप दस्तके यांचे १ जुन रोजी दुपारी तिरुपती येथे जाण्यासाठी नियोजीत रिझर्व्हेशन होते पत्नी सोबत तिरुपती दर्शनाच्या एक दिवस पूर्वीच दुर्दैवी मृत्यु झाला.

गावात या (Hatta death case) घटनेने हळहळ व्यक्त होत असून हया वाळू मुळेच सोन्ना येथील तरुणी अस्मीता गजानन जाधव ही नदीत बुडून २७ मे रोजी वाळुच्या खड्ड्यात बुडून मयत झाली होती, वाळू घाटामुळे अनेक छोटे मोठे वाद होत आहेत. १७ मे रोजी मारामारीत पोलीसांनी खंबीर भूमिका घेतली नाही व काही कारवाई न केल्याने एवढी मोठी घटना घडली आहे. हट्टा येथे पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्लॉटून पोलीस दल पाचारण करण्यात आले आहे. मयत रुद्र याच्यावर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related to this topic: