Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३९ वर्षीय आरोपी अटकेत

उपराजधानीतील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग ३९ वर्षीय आरोपी अटकेत

Harassment Of Minor Girl |

नागपूर (Harassment Of Minor Girl) : उपराजधानीतील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रस्त्याने पायी जात असताना आरोपी शैलेशकुमार नेवाराम पटेल (वय ३९) याने तिचा पाठलाग केला. त्याने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन केले तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरून घरी परतली आणि तिने संपूर्ण घटना पालकांना सांगितली.

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीत आरोपी दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंग आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related to this topic: