Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बेलोरा नाग पिल्ले

गुठ्ठे बेलोरा येथे एका निवासस्थानी आढळली नागाची चार पिल्ल

Belora Nag Pille: गुठळे बेलोर्यातील खुशालराव गुठ्ठे यांच्या घरावर सोमवारी सापाची चार नागाच्या पिल्लांची आढळून येते. वन्यजिवांना मदत करण्यासाठी सर्पमित्री शिखरे यांनी चारीपिल्ला पकडले.


गुठ्ठे बेलोरा येथे एका निवासस्थानी आढळली नागाची चार पिल्ल

Belora Nag Pille |

बासंबा (Belora Nag Pille) : हिंगोली तालुक्यातील गुठ्ठे बेलोरा गावातील खुशालराव गुठ्ठे यांच्या निवासस्थानी १३ जुलै  सोमवार रोजी सापाचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सर्पमित्रांनी त्याला पकडून जीवदान दिले.

गुठ्ठे कुटुंबीयांनी तात्काळ सर्पमित्र पटवेकर महाराज यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सर्पमित्र सोनू शिखरे यांना तातडीने घटनास्थळी पाठवले.  ते ‘इंडियन कोब्रा’ (भारतीय नाग) जातीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पटवेकर महाराज यांनी परिसरात आणखीही पिल्ले असण्याची शक्यता वर्तवली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सोनू शिखरे यांनी घराची आणि आजूबाजूच्या परिसराची कसून पाहणी केली.

अत्यंत दक्षतेने शोध घेतला असता, एकाच ठिकाणी तब्बल चार बेबी कोब्रा आढळून आले. शिखरे यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या चारही विषारी नागपुत्रांना पकडले. या मोहिमेमुळे खुशालराव गुठे यांच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. मानवी वस्तीला असलेला धोका टाळत, पकडलेल्या या चारही पिल्लांना वन विभागाच्या अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. सर्पमित्रांच्या या तत्परतेमुळे वन्यजीवांना जीवनदान मिळाले असून, गुठ्ठे बेलोरा परिसरामध्ये त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.