Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठाचा ११२६३७.०१  लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

स्थानीक गोंडवाना विद्यापीठाचा ११२६३७.०१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.


गोंडवाना विद्यापीठाचा ११२६३७०१  लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

Gondwana University |

विद्यार्थी कल्याणाच्या विविध योजनांचा समावेश

गडचिरोली (Gondwana University) : स्थानीक गोंडवाना विद्यापीठाचा ११२६३७.०१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प तुटीचा असला तरी  विद्यार्थी कल्याणाच्या विविध योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या आधीसभेची बैठक नुकतीच पार पडली .सभेच्या सुरवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव  डॉ. अनिल हिरेखण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला

अभिवादन करून सभेची सुरवात झाली. सुरवातीला विविध विषयांवर ठराव घेण्यात आले.त्यावर साधकबाधक चर्चा झाली. २०२४-२५ चे  सुधारित आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांनी गोंडवाना विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्प ११२६३७.०१  लक्ष असला तरी ३८३५.४९लक्ष ची तूट आहे. या अर्थसंकल्पावर बरीच चर्चा झाली अखेर अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात आगम १०८८०१.५२ लक्ष असून  शोधन ११२६३७.०१ लक्ष रुपयांचे आहे. २०२६-२७च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्यामध्ये विद्यापीठातील विविध विभागांचे संगणकीकरण, अभिलेखांचे डिजिटायझेशन, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर इत्यादी बाबींवर नॅक चमूचा विशेष भर असतो. हे लक्षात घेऊन फर्निचर, उपस्कर उपकरणे आणि सौरउर्जा प्रकल्पासांठी तसेच एज्दrू ण्दर्स्ज्ते विसापूर अशा विविध योजनांसाठी एकूण अनावर्ती खर्च रु. ६१२.४१ लक्ष इतकी तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

इमारत बांधकामाच्या अनुषंगाने, परीक्षा संकुलातील बांधकाम, शारीरिक शिक्षण , मल्टीपरपज स्पोर्ट्स इंडोअर हॉल, चेंजिंग रूम्स, खेळ मैदान विद्यापीठाचे विविध परिसर, इनडोअर स्टेडियम, विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह बांधकाम, तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील उर्वरित कामे तसेच पी. एम. उषा अतंर्गत इत्यादी कामे पूर्ण करण्यासाठी रु. ९१४१.७२ लक्ष ची तरतुद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांच्या इमारती, वसतीगृहे, ग्रंथालये तसेच स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी रु. ७२.५० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन व इंटरनेट-संबंधित सेवा सहज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने बहुपयोगी सुविधा केंद्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रकर्षाने 'विर बाबुराव शेडमाके '(कमवा व शिका) योजना याकरीता १५० लक्षाची तरतुद करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थी सल्ला व सुविधा केंद्रासाठी तरतूद करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी रु. ३३७.०१ लक्ष निधी निश्चित करण्यात आला आहे.

विद्यापीठातील तसेच संचालित संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांना संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी रु. ३५.०० लक्ष (लघू संशोधन प्रकल्प योजना) ची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदु ठरवुन प्रशासनात व परीक्षा प्रणालीत गती आणि पारदर्शकता ही अतिशय महत्वाची बाब आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे येणार्‍या काळात जगातील सर्व क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. याकरिता कृत्रिम बुध्दिमत्तेचा अवलंब करून लाभदायी उपयोग साध्य करण्यास्तव विद्यापीठाने, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (ळघ्ऊ) च्या निर्मितीचे एक पुढचे पाऊल लॉईड मेटल्स च्या सहकार्याने उचलले असुन त्याकरीता २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात रु. ३०० लक्ष आवंटित केले आहे. ही  या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

२०२४-२५ चा वार्षिक अहवाल आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रगती नरखेडकर यांनी सादर केला. त्यास सर्वानुमते मान्यता प्रदान करण्यात आली. त्यानंतर सभा तहकूब झाली. तहकूब झालेल्या अधीसभेची २३ मार्च रोजी बैठक पार पडली. या सभेत प्रश्नोत्तराचा तास गाजला. सिनेट सदस्यांनी प्रत्येकी तीन प्रश्न सादर केले. शैक्षणिक सुधारणा व्हावी व विद्यार्थी संख्या वाढावी या दृष्टीने सादर करण्यात आलेल्या  प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा झाली आणि बहुतांश प्रश्न मार्गीही लागले.  त्यातील जवळपास सर्वच ठरावांना मान्यता देण्यात आली. काही ठरावांचे कौतुक झाले, तर काहींना तात्विक मान्यता प्रदान करण्यात आली.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या उपस्थित  ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली तसेच  सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद लाभला.

परीक्षा विभाग व विद्यार्थी विभागाकरीला लाखो रूपयांचे नियोजन

परीक्षा विभागाचे संगणकीकरण, परीक्षा सुधारणा तसेच आवश्यक उपस्कर/उपकरणे खरेदी, ऑनस्क्रिन मुल्यांकन करण्यासाठी एकूण रुपये १६९६.०१ लक्ष तरतूद सदर अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. शिक्षक व विद्यार्थी गुणवत्ता योजना-त्याकरीता २०० लक्ष तरतुद आणि त्याकरीता १०० लक्ष तरतुद, तसेच कार्याकरीता विद्यापीठाशी सलग्नीत २० महाविद्यालयांना प्रत्येकी ५ लक्ष देण्याच्या  हेतुने १०० लक्ष तरतुद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने अर्थसंकल्पामध्ये ५० लक्षाची तरतुद करण्यात आलेली आहे.

Related to this topic: