Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महिला उष्णघात मृत्यू

गोजेगाव येथे महिलेचा उष्णघाताने मृत्यू

Female heatstroke death: गोजेगाव तालुक्यात ४८ वर्षीय अरुणा संजय सांगळे यांचा उष्णघाताने मृत्यू झाला. तापमान ४१ अंशाच्या पुढे गेल्याने त्यांच्यावर उपचारासाठी औंढा नागनाथ


गोजेगाव येथे महिलेचा उष्णघाताने मृत्यू 

Female heatstroke death |

औंढा नागनाथ (Female heatstroke death) : तालुक्यातील गोजेगाव येथे एका ४८ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना दिनांक २६ एप्रिल रोजी घडली आहे दुपारी शेतातून घरी आल्यानंतर दीड वाजता अचानक  चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील नागरिकांनी त्या महिलेला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उष्माघाताचा हा औंढा नागनाथ तालुक्यातील पहिला बळी ठरला आहे असून मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले आहे.

अरुणा संजय सांगळे वय ४८ वर्ष असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या त्या महिलेचे नाव आहे. ग्रामीण भागात सध्या शेतातील हळद काढणीसह इतर शेतीची कामे केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक २६ एप्रिल रोजी त्या शेतात गेल्या होत्या दुपारी शेतातून घरी आल्या आणि (Female heatstroke death) अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सांगळे, अच्युतराव नागरे, गजानन सांगळे,हनुमान सांगळे, धुरपताबाई नागरे यांनी वाहनाद्वारे तात्काळ अरुणा सांगळे यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान सायंकाळी शेवविच्छेदन करून (Female heatstroke death) मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सेवाविछेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. परंतु सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा ,असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली नव्हती.

Related to this topic: