Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलिस कत्तलखाना छापा

कत्तलखाना जवळ पोलिसांचा धाडसी छापा पाच जणांवर गुन्हा दाखल

Police slaughterhouse Raid: वसंतगडच्या कुरेशी मोहल्ल्यात गुप्त माहितीवरून खळबळजनक छापा मारल्यावर गोमांस कतल करणाऱ्या चार जणांना पकडले गेले. पोलिसांनी एकूण लाख दहा हजार तेरशे


कत्तलखाना जवळ पोलिसांचा धाडसी छापा पाच जणांवर गुन्हा दाखल 

Police slaughterhouse Raid |

 

वसमत येथे मांस विक्रीसाठी गोवंशाची कत्तल प्रकाराने खळबळ

वसमत (Police slaughterhouse Raid) : वसमत शहरात गोवंशाची कत्तल करून नांदेड व इतर ठिकाणी मांस पाठवण्याचा प्रकार वाढला आहे यासंदर्भात वसमत पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कत्तलखान्या जवळ छापा मारला यात दोन गोवंशाची कत्तल केल्याचा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी मांस, अवशेष, व एक ऑटो असा एकूण एक लाख दहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे पोलिसांच्या या कारवाईने गोमांस विक्रेते व कत्तल करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेत आणखी किती सहभागी आहेत त्याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

वसमत शहर  पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कुरेशी मोहल्ला भागात भल्या सकाळी छापा मारला या छाप्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी गोवंष जातीचे दोनजनावर (बैल) यांचे मास विक्री करण्यासाठी धारदार सुऱ्याने कापुन ऑटो मध्ये पोत्यात भरून पाठवण्याची तयारी केल्याचे समोर आले. घटनास्थळावर एक पांढऱ्या रंगाचा शेपुट गोंडा असलेला गळा कापुन मुंडी धडापासुन वेगळी केलेले शरीराचे अवयव रक्ताने माखलेला गोवंश जातीचा बैल व त्यांचे मांस आढळून आले तर आटो क्र.एम.एच.26 बि.डी.5606 यामध्ये मांस भरलेल्या दोन पिशव्या, धारदार सुरा घटनास्थळावर आढळला यावरून दोन बैलांची कत्तल झाल्याचे समोर आले आहे.
 
याप्रकरणी वसमत शहर पोलिसांनी पोलीस हवालदार गजानन भोपे यांच्या तक्रारीवरून मोईज आयुब कुरेशी वय 25 वर्षे  रा. आसार मोहला वसमत, तौसिफ हनिफ कुरेशी रा. कुरेशी मोहला वसमत, आटो क्र. एम.एच.26 बि.डी.5606 चा चालक जबी खदिर शेख व इतर दोन अनोळखी इसम अशा पाच जणांविरोधात वसमत शहर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा कायदा 2015 व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणात एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तर चार जण फरार झाले आहेत त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
 
या (Police slaughterhouse Raid) घटनेने वसमत मधील गोवंशाची कत्तल व मांस तस्करी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपीकडून सर्व रॅकेट उघड होईल व वसमत मधील गोमांस कत्तल कायमची बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

वसमत मधून नांदेड पर्यंत वाहनाद्वारे गोवंशाचे मांस विक्रीसाठी पाठवणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. भल्या पहाटे नांदेड येथील हॉटेल मालक चालक वसमत मधून मांस घेऊन जातात तसेच वसमत तालुक्यातील विविध भागात मांस पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वीही अनेकदा वाहनांमध्ये मांस पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. वसमत शहरातील विविध भागातही  उघड्यावर मांस विक्री केंद्र आहेत. या प्रकाराकडे डोळे झाक होते त्यातून  हे प्रकार वाढीस लागली आहेत पोलिसांना पक्की खबर मिळाल्यामुळे वसमत शहर पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.