Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रीय पशू गाय

हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

National Animal Cow: विराट राष्ट्रीय लोकमंच मागणी करत आहे की, गायीला भारतात राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केला जावे. या निवेदनात गोवंशाचा संरक्षण आणि गोहत्यावर होणारे राजकारण .


हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

National Animal Cow |

विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन

हिंगोली (National Animal Cow) : गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या यावरून सुरू असलेले राजकारण थांबवून गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या सामाजिक संस्थेने केली आहे. विराट राष्ट्रीय लोक मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. 

निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषी प्रधान व संस्कृती प्रधान देश असून येथे विविध जाती-धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. हिंदू संस्कृतीत गायीला आईचे स्थान देऊन गोमाता म्हटले जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गाय-बैलांचे संगोपन शेतकरी कुटुंबातील सदस्याप्रमाणे करतात. (National Animal Cow) गायीचे दूध लहान मुलांच्या पोषणासाठी, गोमूत्र धार्मिक विधी व सेंद्रिय शेतीसाठी तर शेतीच्या कामांसाठी बैलांचा वापर केला जातो. त्यामुळे गाय आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण साजरे केले जातात. 

मात्र, सध्या गोहत्या आणि गोरक्षण या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वार्थासाठी राजकारण केले जात आहे. समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम गाय व गोवंशाच्या नावाखाली केले जात असून त्यातून अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडते. अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागतो. केंद्र व विविध राज्य शासनांकडून परकीय मुद्रा व मोठ्या प्रमाणावर मिळविण्यासाठी बिफच्या कारखान्यांना परवानगी दिली जाते. कारखान्याचे मालक एका धर्मातील असले तरी दुसऱ्या धर्माचे लोकच त्यात काम करतात, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. 

त्यामुळे गोवंश, गोरक्षण व गोहत्या यावरून सुरू असलेले राजकारण व अप्रिय घटना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच तर्फे करण्यात आली आहे. या (National Animal Cow) निवेदनावर राष्ट्रीय संचालक शेख नोमान नवेद, उपाध्यक्ष रवी बन्सीलाल जैस्वाल, शेख आवेज महेबुद, जिल्हाध्यक्ष शेख वासीत महेबुब, शहराध्यक्ष पठाण साजीद खान यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Related to this topic: