Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

गो सम्मान अभियान

अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार यांना निवेदन

Go Samman campaign: रिसोडमध्ये गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. पंतप्रधानांकडे देशी गायींचे संरक्षणासाठी विविध मागण्या समाविष्ट आहेत.


अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार यांना निवेदन 

Go Samman campaign |

रिसोड (Go Samman campaign) : अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत संपूर्ण भारत देशात दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार  मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंचे संरक्षण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 रिसोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 10 वाजता शुभम सरनाईक यांच्या सजवलेल्या देशी गाईसह गो सम्मान अभियान (Go Samman campaign) अंतर्गत गो सम्मान  यात्रा काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना अखिल भारतीय गोसम्मान अभियान अंतर्गत 2880 गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गाईंचे संरक्षण होण्यासाठी गाईला राष्ट्रमाता चा दर्जा देण्यात यावा, शालेय अभ्यासक्रमामध्ये गो विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर गाईंचे अपघात होतात म्हणून गो ॲम्बुलन्स ठेवण्यात याव्यात,गाईंना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा सुरक्षा कायदा करण्यात यावा,केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा,गाईंची तस्करी व गोहत्या बंद होण्यासाठी कडक कायदा करून आजीवन कारावास ही शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

निवेदन देते वेळी नारायणी गोशाळा प्रकल्प (Go Samman campaign) मोरगव्हाणचे  गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडी चे तुकाराम महाराज जायभाये, श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रा दीपक जोशी प्रा स्वप्निल साकळे, सद्गुरु दत्त गोरक्षण व वन्य औषधी संस्था कवठाचे वीरेंद्र सरनाईक,निवृत्ती पाटील डॉ अशोक इंगोले, जयंत वसमतकर,दिगंबर भिते, शितल पांडे, स्नेहा लोथे,भावना भिते, लता ईरतकर,नंदू मगर, विजय खडसे, समाधान छत्रे,भीमा माळेकर, नंदू देशमुख, निलेश जैन, महादेव पावडे, प्रज्वल सरनाईक, रितेश सरनाईक, अनिल सोनुने,शरद सरनाईक,रमेश रोडे,सुनील अल्लाट, आबाराव सरनाईक,घनश्याम फडतडे, प्रितेश सरनाईक,महादेव देशमुख,गोपाल सरनाईक,अभिषेक सरनाईक,सागर महाराज शांडिले,गजानन मुलंगे, अजबराव देशमुख यांच्या शेकडो  गो भक्त उपस्थित होते.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाई साठी पाठविण्याचे सांगितले.

Related to this topic: