Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोट वनविभाग आग

घोट वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग; २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक…

Ghot Forest Department Fire: घोट येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागली, जंगलात अंदाजे २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक झाले. शेतकरीने आग लावून जंगलात आग वाढली,


घोट वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक…

Ghot Forest Department Fire |

घोट (Ghot Forest Department Fire) : घोट येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत अंदाजे २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने रौद्र रूप धारण करत संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.

प्राप्त माहितीनुसार, (Ghot Forest Department Fire) लाकूड डेपोच्या शेजारील शेतीमध्ये एका शेतकऱ्याने तण जाळण्यासाठी आग लावली होती.सुरुवातीला आग नियंत्रणात असल्याचे दिसत होते, मात्र काही वेळानंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने आगीने अचानक मोठे स्वरूप धारण केले. बघता बघता आगीचे लोळ थेट वनविभागाच्या लाकूड डेपोकडे सरकले आणि तेथील मिश्र बिटांनी पेट घेतला.सदर बिट हे वनविभाग व जंगल कामगार संस्था पळसगाव यांच्या संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्य डेपो व्यतिरिक्त काही अंतरावर दुसऱ्या ठिकाणीही आग लागून तेथील सुमारे आठ ते दहा बिट जळाल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ चामोर्शी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला.वृत्त लिहीपर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

Related to this topic: