Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोट येथे वृक्षारोपण व जनजागृती रॅली; पोलीस व वनविभागाचा संयुक्त उपक्रम

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची साजरी करण्यासाठी घोट येथे पोलीस मदत केंद्र, वन विभाग आणि गावकरींचा संयुक्त उपक्रम आयोजित झाला. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जनजागृती रॅली


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोट येथे वृक्षारोपण व जनजागृती रॅली पोलीस व वनविभागाचा संयुक्त उपक्रम

World Environment Day |

घोट (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पोलीस मदत केंद्र घोट व वनपरिक्षेत्र कार्यालय घोट यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी जनजागृती रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅलीने करण्यात आली. रॅलीद्वारे पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवडीचे महत्त्व व स्वच्छता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी बसस्थानक चौकात उपस्थितांनी (World Environment Day) पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर पोलीस मदत केंद्र परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे, घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे,भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, तमुंस अध्यक्ष दिनकर लाकडे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ सय्यद, माहिती अधिकार पत्रकार सेनेच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा, उर्मिला पोगुलवार,लीना विश्वास, पत्रकार हेमंत उपाध्ये, पांडुरंग कांबळे, बबीता शहा यांच्यासह पोलीस व वनविभागाचे कर्मचारी, गावकरी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. (World Environment Day) वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.