Daily Deshonnati Anniversary: घोट येथे दैनिक देशोन्नतीच्या २२व्या वर्षाच्या वरधापनदिनासाठी वृक्षारोपण आणि विशेषांकांचा प्रकाशन करताना मान्यवरांना उपस्थिती मिळाली.
घोट (Daily Deshonnati Anniversary) : दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त घोट येथील वन विभागाच्या वसुंधरा जैवविविधता उद्यानात वृक्षारोपण तसेच दैनिक देशोन्नतीच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते संजय वडेट्टीवार,विकास सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोट शाखेचे व्यवस्थापक धनंजय चिंचोलकर, बँक निरीक्षक सुंकरवार, माजी तमुस अध्यक्ष परशुराम दुधबावरे,प्रा. सी. के. कांबळे, घोट अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद, गिरिश उपाध्ये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र दुधबावरे,भाजप आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास उईके, विकास सहकारी भात गिरणीचे उपाध्यक्ष बाबुराव भोवरे, अतुल येनगंटीवार, संजय कपाट, बबलू शाहा, बंडू जुवारे,उमेश सरकार, जितेन शाहा, किशोर पातेवार, गोपाल विश्वास, खुशाल कोठारे, नीरज बारसागडे, कामेश्वर कुळसंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांनी दैनिक देशोन्नतीच्या ग्रामीण पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करत वृत्तपत्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार पत्रकार हेमंत उपाध्ये यांनी मानले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी देशोन्नतीची भूमिका महत्त्वाची: मान्यवर
दैनिक देशोन्नतीने गेली २२ वर्षे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने आणि निर्भीडपणे मांडत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका सक्षमपणे बजावली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी देशोन्नती हे प्रभावी व्यासपीठ ठरले असून ग्रामीण विकास, लोकशाही मूल्यांचे जतन आणि समाजहितासाठी या (Daily Deshonnati Anniversary) वर्तमानपत्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.