Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गंगाखेड एसआयआर मोहिम

परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

Gangakhed SIR Campaign: गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघ..


परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल

Gangakhed SIR Campaign |

 

मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण पूर्ण

परभणी (Gangakhed SIR Campaign) : गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्याने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहीम राबवून मतदार यादी अद्यावत केली जात आहे. या मोहिमेत गंगाखेड (Gangakhed SIR Campaign) येथील उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार अशोकराव केंद्रे, नायब तहसीलदार विनोद पवार, नायब तहसीलदार पी. एस. शिंदे, प्रा.शि. किशोर मस्के, सहा महसूल अधिकारी उपेंद्र करवंदे, सहा महसूल अधिकारी प्रकाश आय्या, सहा महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार, महसूल सहाय्यक राफे अंसारी, संगणक चालक प्रेम गोडबोले, अरविंद पंडीत, संजय वाघमारे आदींसह तिन्ही तालुक्यातील ४३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, महसूल सेवक (कोतवाल), पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानदार व गंगाखेड विधानसभा मतदार संघातील सर्व राजकीय पक्षांचे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी आदींनी घेतलेल्या परिश्रमामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील ४१७४८१ मतदारांपैकी ३८०६८२ मतदारांचे (मॅपिंग) मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) तसेच उर्वरित सर्व मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण करून परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. दुबार नावे, मयत व स्थलांतरीत तसेच नोंदींमध्ये विसंगती आढळलेल्या ३६७९९ मतदारांचे प्रगणना पत्र असंकलनीय राहिल्याने या मतदारांची सुनावणी घेऊन यातील विसंगती लवकरच दूर केली जाणार आहे.

गंगाखेड विधानसभा मतदार संघाने (Gangakhed SIR Campaign) शंभर टक्के काम पूर्ण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related to this topic: