Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

हॉटेल, चहा टपरी धारक, धाबे वाल्यांना कमर्शियल सिलेंडर व केरोसीन तात्काळ उपलब्ध करून देण्याची शिवसेना (उबाठा) ची उपविभागी

मलकापूर व नांदुरा तालुक्यात सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून घरगुती तसेच कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने मलकापूर,नांदुरा तालुक्यात गॅस धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.


हॉटेल चहा टपरी धारक धाबे वाल्यांना कमर्शियल सिलेंडर व केरोसीन तात्काळ उपलब्ध करून देण्याची शिवसेना उबाठा ची उपविभागी

Fuel Crisis |

मलकापुर (Fuel Crisis) : मलकापूर व नांदुरा तालुक्यात सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून घरगुती तसेच कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने मलकापूर,नांदुरा तालुक्यात गॅस धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सी पुढे पहाटे सहा वाजेपासून सिलेंडर साठी भर उन्हात लाईन लावून नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.तसेच व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने छोटे खानी हॉटेल, चहा टपरीधारक,धाबे वाल्यांचे रोजगार बंद झाले आहे.

शासनाने डिझेल व पेट्रोल ही बाटली , कॅनमध्ये देणे बंद केले असल्यामुळे शेती मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.केरोसीन ही  उपलब्ध नसल्याने हॉटेल वाल्यांचे धंदे पूर्णतः बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने या छोट्या हातमजुरी करणाऱ्या धंदेवाल्यांना केरोसीन उपलब्ध करून द्यावे व पेट्रोल पंप धारकांना शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल, कॅन, बाटलीमध्ये देण्याचे सुचित करावे अशी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास ,उप शहर प्रमुख बाळू पोलाखारे,किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार,उप तालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, शिवसेना नगरसेवक शेख निजामभाई, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी ,माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम,शेख मोहसीन सह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यां नमूद आहे.

Related to this topic: