Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापुरात १८ जून रोजी मोफत गुडघा व नितंब प्रत्यारोपण तपासणी शिबिर


मलकापुरात १८ जून रोजी मोफत गुडघा व नितंब प्रत्यारोपण तपासणी शिबिर

Free Health Camp |

आमदार चैनसुख संचेती यांचा पुढाकार; पात्र रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया

मलकापूर (Free Health Camp) : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून १८ जून रोजी मलकापूर येथे मोफत गुडघा व नितंब प्रत्यारोपण (Knee and Hip Replacement) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भाजपा जनसंपर्क कार्यालय, मलकापूर येथे आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

शिबिरात प्रख्यात गुडघा प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. नारायण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. खंडेलवाल यांनी आतापर्यंत १२ हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून त्यांच्या अनुभवाचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.

तज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञांकडून सखोल तपासणीनंतर जे रुग्ण गुडघा किंवा नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील, त्यांच्यावर मुंबई येथील संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना औषधांचे विनामूल्य वितरणही केले जाणार आहे.

विविध संस्थांचे सहकार्य

हे शिबिर आमदार चैनसुख संचेती वैद्यकीय मदत कक्ष, मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन (मुंबई), संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

रुग्णांसाठी सूचना

गुडघेदुखी, नितंबदुखी, चालताना त्रास होणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा वारंवार वेदना जाणवणे अशा समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे. तपासणीसाठी येताना जुने एक्स-रे, वैद्यकीय अहवाल तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर (माऊली) निकम – ८५३०५७५३४३, प्रविण डंगे – ९४०५७७८८५०, दीपक भोलवनकर – ८७६६५४८२५२, पंकज निकरे – ९८२२९५०३४४, किशोर राऊत – ८०८०६८२०३२ आणि निखिल देशमुख – ९३०९१७४८७३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मलकापूर शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार चैनसुख संचेती यांच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Related to this topic: