Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत तूर खरेदी व्यवहारात व्यापार्‍याची २८ लाखांला फसवणुक

शहरात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातून तब्बल २८ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परभणीत तूर खरेदी व्यवहारात व्यापार्‍याची २८ लाखांला फसवणुक 

Fraud Case |

शहरातील कोतवाली पोलीसात फसवणूकीचा गुन्हा आरोपी पसार...!

परभणी (Fraud Case) : शहरात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातून तब्बल २८ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटने बाबत अधिक माहिती अश की, फिर्यादी भारत मुक्तावर यांचा नवामोंढा परिसरात ‘न्यानसिंह ट्रेडिंग कंपनी’ नावाने आडत व्यवसाय आहे. ते आपल्या मुलासह शेतकर्‍यांकडून सोयाबीन, तूर, हरभरा आदी शेतमाल खरेदी करून पुढे विक्री करतात. आरोपी महेश डावरे याची ओळख २०२१ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२५ मध्ये त्याच्याशी तूर खरेदीचा व्यवहार सुरू झाला. २ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपीने मुक्तावर यांच्या दुकानात येऊन तूर खरेदीचा व्यवहार केला. ठरलेल्या दरानुसार विविध ठिकाणांहून एकूण सुमारे ८०० क्विंटल तूर त्याला विक्री करण्यात आली. या मालाची एकूण किंमत ५२ लाख ७३ हजार ८०० रुपये होती. त्यापैकी आरोपीने सुमारे २४ लाख रुपये अदा केले, तर उर्वरित २८ लाख ७३ हजार ८०० रुपये आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ठरलेल्या वेळेत पैसे न देता आरोपी टाळाटाळ करू लागला. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, आरोपीने आपला निवासस्थान देखील बदलून संपर्क तोडल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रामराव मुक्तावर  यांच्या फिर्यादीवरुन महेश दत्तात्र्य डावरे  उर्फ सौरभ दत्तात्र्य कातनेश्वरकर यांच्या विरुध्द कोतवाली पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: