Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कलाकार मानधन मंजूर करून देण्याच्या नावाखाली कुरखेडा तालुक्यात होत आहे फसवणूक

महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे.


कलाकार मानधन मंजूर करून देण्याच्या नावाखाली कुरखेडा तालुक्यात होत आहे फसवणूक

Fraud Alert |

कुरखेडा तालुक्यात टोळी सक्रिय

कुरखेडा (Fraud Alert) : महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. पण या वृद्ध कलावंतामध्ये बोगस कलाकारांची भरती करण्याकरिता कुरखेडा तालुक्यात एक भामटी टोळी सक्रिय झाली असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आव्हान वृद्ध कलावंत समिती कुरखेडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्यात काही पोटभरून लोकांनी गावागावात फिरून आम्ही तुमची वृद्ध कलावंताने मानधन सुरू करून देतो, प्रमाणपत्राची चिंता करू नका, प्रमाणपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत, तुम्हाला फक्त दोन-तीन हजार रुपये खर्च करावे लागतील असे म्हणून कुरखेडा तालुक्यातील कलाकार मानधनच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली असून तालुक्यातील अनेक लोकांकडून यांनी लुबाडणुक केली आहे.

गेल्या तीन वर्षापासून भामट्यांनी हा फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. ज्यांनी या टोळीतील लोकांना पैसे दिले आहेत, त्यांनी कलाकार मानधन केसेस संदर्भात विचारणा केली असता तुमच्या नावाची तक्रार केली आहे. त्यामुळे तुमचा पगार जमा झाला नाही अशा प्रकारे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत. ज्यांची कुणाची अशी फसगत झाली असेल त्यांनी पोलीस स्टेशनला भामट्यांची तक्रार दाखल करावी व आपले पैसे वसूल करावे व भूलथापेला बळी पडू नये. काही खोटे प्रमाणपत्र जोडून मानधन उचलीत आहेत, त्याची सुद्धा योग्य चौकशी करावी अशी मागणी वृद्ध कलावंत तालुका संघटना अध्यक्ष पुंडलिक नागपुरकर महाराज यांनी  केली आहे.

Related to this topic: