Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

जनसंघर्ष प्रकरणात १६ एप्रिल रोजी सुनावणी!

दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीत ४९ कोटी ६९ लाख अपहार करणाऱ्या मास्टर माइंड प्रणीत मोरे याने खातेदारांच्या ठेवीतून अनेक गैरव्यवहार केले आहेत.


जनसंघर्ष प्रकरणात १६ एप्रिल रोजी सुनावणी 

Financial Fraud Case |

नायरा पंप ने १ कोटी ४० लाख न भरल्यास पंप सील करणार!

मानोरा (Financial Fraud Case) : दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीत ४९ कोटी ६९ लाख अपहार करणाऱ्या मास्टर माइंड प्रणीत मोरे याने खातेदारांच्या ठेवीतून अनेक गैरव्यवहार केले आहेत. त्यामध्ये पेट्रोलपंपाचे प्रकरण दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

सुनावणीदरम्यान पेट्रोलपंपाचे १ कोटी ४० लाख रुपये १० एप्रिलपूर्वी भरण्याचे आदेश संबंधितांना दिले होते जनसंघर्षमध्ये ६ हजार २०० खातेदारांचे तब्बल ४९ कोटी रुपये अडकले आहेत.  पेट्रोलपंप व्यवहारातील एक कोटी ४० लाखांचा भरणा १० एप्रिलपूर्वी न झाल्यास जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने सक्षम प्राधिकाऱ्यांना दिले होते रक्कम न भरल्यामुळे सक्षम प्राधिकऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पुढील न्यायालयाची सुनावणी आता १६ एप्रिल रोजी असल्याने पुढील कारवाईकडे यवतमाळसह वाशिम जिल्हयातील खातेदारांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: