Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Farmer Training

राजाटोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण संपन्न

तालुक्यातील मौजा राजाटोला येथे दिनांक १९ जून २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (DSAO) मा. प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.


राजाटोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण संपन्न

Farmer Training |

'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर पावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्याचे आवाहन; विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

कोरची (Farmer Training) : तालुक्यातील मौजा राजाटोला येथे दिनांक १९ जून २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (DSAO) मा. प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, बदलते हवामान आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये चालू खरीप हंगामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः 'अल निनो' (Al Niño) मुळे निर्माण होणाऱ्या पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मा. प्रीती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. कमी अथवा अनियमित पावसातही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी पिके आणि पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी कोरचीचे तालुका कृषी अधिकारी (TAO) श्री. नागेश मिसाळ यांनी तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

ते म्हणाले,
"कोरची तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे. मात्र, यंदा हवामानाचे आव्हान मोठे आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची पेरणी करण्यापूर्वी उगवणक्षमता चाचणी अवश्य करावी, जेणेकरून बियाणांवरील वाया जाणारा खर्च टाळता येईल. कृषी विभागामार्फत गावात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेल्या 'गादी वाफा रोपवाटिका' आणि 'श्री' (SRI) पद्धतीचा अवलंब केल्यास प्रतिकूल परिस्थितीतही भाताचे उत्तम उत्पादन घेणे शक्य आहे. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून निंबोळी अर्क आणि जीवामृतासारख्या सेंद्रिय पर्यायांकडे वळावे. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला कृषी विभागाचे पूर्ण सहकार्य लाभेल."

प्रशिक्षणादरम्यान विविध कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके

प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना केवळ माहिती देण्यापुरते न थांबता प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.

बीजप्रक्रिया व उगवणक्षमता चाचणी :
पिकांची निरोगी वाढ आणि अधिक उत्पादनासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी तसेच उगवणक्षमता कशी तपासावी, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

जैविक व सेंद्रिय निविष्ठा :
रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी निंबोळी अर्क, जीवामृत आणि बिजामृत तयार करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

आधुनिक भात शेती :
भात शेतीसाठी गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या 'श्री' (SRI) पद्धतीने धान लागवडीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मा. प्रीती हिरळकर म्हणाल्या,
"बदलत्या हवामानात 'अल निनो'चे संकट लक्षात घेता शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतींना फाटा देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आणि पर्यायी पिकांचा अवलंब करावा."

मान्यवरांची उपस्थिती

या यशस्वी कार्यक्रमास गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. प्रीती हिरळकर यांच्यासह कोरचीचे तालुका कृषी अधिकारी (TAO) श्री. नागेश मिसाळ, मंडल कृषी अधिकारी (CAO) श्री. ज्ञानेश्वर मसराम, उप कृषी अधिकारी श्री. ईश्वर पाथोरे तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.

राजाटोला गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Related to this topic: