Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Farmer Fraud

परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना; धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.


परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

५.५६ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा; १०० ते १५० शेतकरी आर्थिक फसवणुकीचे बळी

परभणी : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून विविध प्रकारचा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याची रक्कम न देता फरार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ५ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामप्रसाद साहेबराव काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शेख हमीद उर्फ अमित शेख सरू आणि शेख सरू शेख बालेसार यांनी झिरोफाटा येथील जय किसान ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानाच्या माध्यमातून १ ऑक्टोबर २०२३ ते ३० मे २०२६ या कालावधीत शेतकऱ्यांकडून हळद, हरभरा, सोयाबीन, गहू आणि तूर यांसह विविध धान्याची खरेदी केली.

खरेदी केलेल्या शेतमालाची एकूण किंमत ५ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपये असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दोन्ही व्यापारी गाव आणि घर सोडून पसार झाले असून त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. पाटील करत आहेत.

Related to this topic: