Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

“सायरन बंद... आता ई-कारमधूनच माजी मंत्री आ. बनसोडेंची एन्ट्री!”

ईराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन संकटाची चाहूल लागली असताना देशातही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या वापरामुळे चिंता व्यक्त होत आहे.


“सायरन बंद आता ई-कारमधूनच माजी मंत्री आ बनसोडेंची एन्ट्री”

Electric Vehicle |

उदगीर (Electric Vehicle) : ईराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन संकटाची चाहूल लागली असताना देशातही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या वापरामुळे चिंता व्यक्त होत आहे. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री, राज्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींना ताफ्यातील वाहनसंख्या कमी करण्याचे तसेच पेट्रोल-डिझेल वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला सर्वात ठोस आणि धडाकेबाज प्रतिसाद देत माजी क्रीडा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या ताफ्यात मोठा बदल करत राजकीय संस्कृतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केवळ ताफ्यातील वाहनांना कात्री लावली नाही, तर कायम सोबत असणाऱ्या पोलीस एस्कॉर्टलाही स्पष्ट नकार दिला आहे.

“आता माझ्या ताफ्यात फक्त एकच वाहन राहील आणि तेही ई-कार!” अशी घोषणा करत त्यांनी एमएच-२४-बीएक्स-९४०० क्रमांकाची ई-कार वापरण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यावरणपूरक आवाहनालाही प्रतिसाद देत बनसोडे यांनी आपल्या दौऱ्यांमधून एस्कॉर्ट संस्कृतीलाच रामराम ठोकला आहे.“पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मी स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे. इतरांनीही पुढे यावे,” असे आवाहन आ. बनसोडे यांनी केले.

दरम्यान, वाढते इंधन दर, जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि ऊर्जा संकटाच्या छायेत एका आमदाराने स्वतःच्या ताफ्यालाच ब्रेक लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“ताफ्याला ब्रेक… ई-कारला ग्रीन सिग्नल!”

माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी ई-कारमधून दौरे करत एस्कॉर्ट संस्कृतीला रामराम ठोकत मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमुळे त्यांच्या ई-कारची मोठी चर्चा रंगत आहे.

राजकारणात मोठे ताफे, सायरन आणि एस्कॉर्ट संस्कृतीला सरावलेल्या वातावरणात बनसोडे यांनी घेतलेला हा निर्णय वेगळा आणि धाडसी मानला जात आहे. इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचा संदेश देणारा हा निर्णय राज्यभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

राजकीय वर्तुळातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, भविष्यात इतर लोकप्रतिनिधीही असा पायंडा पाडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: