Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Dumri Flyover

डुमरी उड्डाण पुलावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोन मित्रांचा मृत्यू

कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील डुमरी उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.


डुमरी उड्डाण पुलावर भीषण अपघात उभ्या ट्रकला दुचाकीची धडक दोन मित्रांचा मृत्यू

Dumri Flyover |

कन्हान (Dumri Flyover) : कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील डुमरी उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. पुलावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा न देता उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ओमप्रकाश यशवंत बावणे (वय ३९, रा. संताजी नगर, वॉर्ड क्र. ६, कन्हान) आणि त्यांचा मित्र रोहित लालसिंग सोयाम (वय २७, रा. घनशौर, जि. सिवनी, मध्यप्रदेश) हे दुचाकी क्रमांक एमएच ४० सीपी ०१५९ ने कन्हानवरून आमडी फाट्याकडे जात होते.

रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास डुमरी स्टेशन उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या यूपी ५३ ईटी ९४०५ क्रमांकाच्या वीसचाकी ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना उपचारासाठी कामठी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

मृतक ओमप्रकाश बावणे यांचे मोठे बंधू ज्ञानेश्वर यशवंत बावणे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, ट्रक चालकाने पुलावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा इशारा न देता वाहन उभे केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. संबंधित ट्रक चालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अपघातातील मृतक ओमप्रकाश बावणे यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर रोहित लालसिंग सोयाम हा पुण्यात ट्रॅव्हल्स वाहन चालवित होता. तो दोन दिवसांपूर्वी कन्हान येथे मित्राला भेटण्यासाठी आला होता आणि शुक्रवारी सायंकाळी पुण्याला परत जाणार होता. मात्र, या भीषण अपघातात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. डुमरी स्टेशन चौकातील हायमास्ट दिवे तसेच उड्डाण पुलावरील दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्री येथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे हे दिवे तातडीने सुरू करावेत तसेच पुलांवर व महामार्गांवर वाहने उभी करणाऱ्या चालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

छायाचित्रे :

  1. मृतक ओमप्रकाश यशवंत बावणे.
  2. मृतक रोहित लालसिंग सोयाम.
  3. घटनास्थळी उभा ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी.

Related to this topic: