Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

दुचाकी अपघाती मृत्यू

रस्ता ओलांडताना बाप लेकास दुचाकीने उडवले, एकाचा मृत्यू

Bike Accidental Death: आखाडा बाळापूर तालुक्यातील बोथी रस्त्यावर एक दुचाकीच्या चालकाने रस्ता ओलांडणारे दोन परिवार सदस्य बापला लेकास धडक दिला.


रस्ता ओलांडताना बाप लेकास दुचाकीने उडवले एकाचा मृत्यू 

Bike Accidental Death |

आखाडा बाळापूर (Bike Accidental Death) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणारे बाप लेकास धडक दिली यात वडिलांचा गंभीर जख्मी होऊन मृत्यू झाला तर मुलगा जख्मी झाला याबाबत आज सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी  सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर आप्पा देववाडी येथे रामा अनंता वागतकर व त्यांचे वडील अनंता गंगाराम वागतकर(वय ६०वर्षे)हे दोघं रस्ता ओलांडत असताना दुचाकी एम एच २६ ए एक्स ७२५८च्या चालकाने त्याची दुचाकी भरधाव वेगाने हलगर्जीपणाने चालवून बापलेकास धडक दिली यात अनंता वागतकर हे गंभीर जख्मी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर रामा वागतकर हे किरकोळ जख्मी झाले.याबाबत बुधवारी रामा वागतकर फिर्यादीवरून सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास बिट प्रमुख सिताराम मस्के हे करत आहेत.

Related to this topic: