Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. संतोष टारफे शिवसेना प्रवेश

उभाठा शिवसेनेचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर

Dr. Santosh Tarfe: माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे, ते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.


उभाठा शिवसेनेचे माजी आमदार डॉ संतोष टारफे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर

Dr. Santosh Tarfe |

कळमनुरी (Dr. Santosh Tarfe) : माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात रंगत आहे.

डॉ. टारफे (Dr. Santosh Tarfe) यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवून सुमारे ९० हजार मते मिळवली होती त्यांच्या शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर यांनी पराभव केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय हालचाली कमी झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

दरम्यान, लवकरच हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमात डॉ. संतोष टारफे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा अधिकच जोर धरत आहे. याबाबत डॉ. टारफे (Dr. Santosh Tarfe) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की माझ्याशी विविध पक्षांचे नेते संपर्कात आहेत. मात्र, मी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय समिकरण बदलण्याची शक्यता
मागील काही निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) यांनी दंड थोपटले होते. मध्यंतरी विधान परिषदेच्या माजी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात भाजपने पाळेमुळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड म्हणुन उबाठा शिवसेनेचे माजी आ. डॉ. संतोष टारफे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास भविष्यात या मतदार संघात राजकीय वातावरण निश्चित बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related to this topic: