Breaking News
  • भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी, पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद
  • नागपूरात महाल येथील बडकस चौकापासून काही अंतरावर असलेल्या आयचित मंदिर परिसरात एका व्यक्तीवर चाकू हल्ला, उपचार सुरु
  • पुण्याच्या भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका
  • कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; काही तासांत १३० नागरिकांना चावा
  • नाशिकमध्ये हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला
  • नाशिक- मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू
  • स्मार्ट मीटरविरोधात मालवण-वायरी ग्रामस्थ आक्रमक, महावितरणच्या कार्यालयात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Dr Gopal Soni Death

बुलढाण्यात प्रख्यात डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू; शेतात आढळला मृतदेह, तीन जण ताब्यात

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत प्रसिद्ध डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटना चर्चेत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


बुलढाण्यात प्रख्यात डॉ गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू शेतात आढळला मृतदेह तीन जण ताब्यात

Dr Gopal Soni Death |

खामगावमधील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक; मृत्यू नैसर्गिक की घातपात? खामगाव ग्रामीण पोलिसांकडून चौकशी

बुलढाणा : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत प्रसिद्ध डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटना चर्चेत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉ. गोपाल सोनी यांचा मृतदेह त्यांच्या शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

यापूर्वी सोलापूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांच्या मृत्यूची घटना समोर आली होती. त्यानंतर नाशिकमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. आता डॉ. गोपाल सोनी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे डॉक्टरांच्या मृत्यूच्या घटनांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

रविवारी एकटेच गेले होते शेतात

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार असल्याने डॉ. गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांनी ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. इतक्या कमी कालावधीत नेमके काय घडले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण काय, याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

डॉ. गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट होते. तसेच ते सोनी रक्तपेढीचे संचालक होते. गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव शहरातील एकमेव रक्तपेढी चालवत त्यांनी रुग्णांना सेवा दिली होती. त्यामुळे खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा मोठा परिचय होता.

भावाच्या तक्रारीवरून पोलिसांचा तपास

डॉ. सोनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. डॉ. गोपाल सोनी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला की या घटनेमागे घातपात आहे, याचा तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात परिचित असलेल्या डॉ. गोपाल सोनी यांचा अशा परिस्थितीत मृतदेह आढळल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या चौकशीनंतरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Related to this topic: