Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पिसाळ कुत्रा धुमाकूळ

डोंगरकड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 13 जणांना चावा

Rabid Dog Rampage: डोंगरकड्यातील कुत्र्यांची हल्ल्याच्या दुष्परिणामांमुळे जखमी झाले १३ लोक. त्यांचा सहभाग असलेल्या एकाच पाळीव कुतऱ्याची शिकणासाठी पशुवैद्यक उपचार चालू आहेत.


डोंगरकड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ 13 जणांना चावा

Rabid Dog Rampage |

 

अडीच वर्षाच्या बालकाची प्रकृती गंभीर

डोंगरकडा (Rabid Dog Rampage) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 3 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी 10 च्या सुमारास या कुत्र्याने तब्बल 13 जणांना चावा घेतल्याची घटना घडली. त्यात दोन लहान बालकांचाही समावेश आहे.

 2 ऑगस्टपासूनच ही कुत्री परिसरात धुमाकूळ घालत होती. तिने याआधी पाच कुत्र्यांना चावा घेतला होता. त्यातील एक पाळीव कुत्रा असून त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये 2 ते अडीच वर्षाचा शिवतेज प्रभू गावंडे याला सर्वाधिक गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इतर जखमींची नावे पुढीलप्रमाणे उमेश लक्ष्मण इंगोले* 10 वर्ष, शकुराव ग्यानोजी बुलबुले 67 वर्ष, जीहान चांदखान पठाण 5 वर्ष, सुरेश रुस्तुम खंदारे 27 वर्ष, आरुष राजू शंकर 10 वर्ष, विठ्ठल हनुमंत इंगोले 75 वर्ष - सर्व रहिवासी डोंगरकडा.

याशिवाय तेलंगणातील परप्रांतीय साजन सिंग 25 वर्ष आणि रेल्वेचे पाच कर्मचारी हे देखील जखमी झाले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहेत त्यांची नावे कळु शकली नाहीत.