Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार चैनसुख संचेती

मलकापूर तालुक्यातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत अलीम्कोमार्फत प्राप्त सहाय्यक साहित्याचे वितरण आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आले.


समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार चैनसुख संचेती

Divyang Students |

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीम्को निर्मित सहाय्यक साहित्याचे वितरण

मलकापूर (Divyang Students) : समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अलीम्को निर्मित सहाय्यक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती मलकापूरच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते.

मलकापूर तालुक्यातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत अलीम्कोमार्फत प्राप्त सहाय्यक साहित्याचे वितरण आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये बॅटरीवर चालणारी तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल, टीएलएम किट, ब्रेल केन, रोलेटर, व्हीलचेअर, सीपी व्हीलचेअर विथ कमोड, सुगम्य काठी, हिअरिंग एड्स, व्हिज्युअल किट, असिस्टिव्ह डेली किट, अडल्ट सेलफोन आदी साहित्याचा समावेश होता. एकूण १८ दिव्यांग विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार चैनसुख संचेती म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणातून प्रगत आणि समावेशक समाजाची निर्मिती होऊ शकते. केंद्र व राज्य शासन समग्र शिक्षा योजनेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांचा विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कु. वेदिका सजगाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सी. जे. ढवक, गटशिक्षणाधिकारी एन. जे. फाळके, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पाटील, मोहन शर्मा, रामभाऊ झांबरे, ज्ञानदेवराव वाघोदे, यश संचेती, शैलेशसिंह राजपूत, अश्विनीताई काकडे, प्रवीण क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एन. जे. फाळके यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी एन. बी. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष शिक्षिका अर्चना हिंगणकर, सुचिता शेकोकार, आम्रपाली सावळे, केंद्रप्रमुख देविदास नाफडे, पद्माकर पाटील तसेच मुख्याध्यापक आर. आर. पाटील, दिगंबर किनगे, नितीन महाले, निलेश सोळंके, शंकर बोंडे, सुरेश तायडे, अजय फिरके आणि पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचा समारोप कनिष्ठ प्रशासन अधिकारी गजानन पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Related to this topic: