Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > आपले शहर > पुणे

Disability Certificate Scam

सोलापूर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; RMOसह आठ जण अटकेत, तीन जिल्ह्यांपर्यंत रॅकेटचे धागेदोरे

सोलापूर शासकीय रुग्णालयातील कथित बनावट दिव्यांग (अपंगत्व) प्रमाणपत्र प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे.


सोलापूर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा rmoसह आठ जण अटकेत तीन जिल्ह्यांपर्यंत रॅकेटचे धागेदोरे

Disability Certificate Scam |

सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिकपर्यंत तपासाचा विस्तार; बनावट आधार कार्डांच्या आधारे अपंगत्व प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप

सोलापूर शासकीय रुग्णालयातील कथित बनावट दिव्यांग (अपंगत्व) प्रमाणपत्र प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान या घोटाळ्याचे जाळे सोलापूरपुरते मर्यादित नसून अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांपर्यंत पसरल्याचे समोर आले असून, आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

शहर गुन्हे शाखेच्या तपासात या संपूर्ण प्रकरणामागे एका सेल्समन एजंटची प्रमुख भूमिका असल्याचे उघड झाले आहे. सरकारी नोकरी नियमित करण्याच्या उद्देशाने काही कर्मचाऱ्यांनी बनावट आधार कार्डांचा वापर करून दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात एका सामाजिक संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर झाली होती. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आणि त्याआधारे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पुढे सरकत असताना या घोटाळ्याचे धागेदोरे तीन जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी थेट शासकीय डॉक्टरालाच अटक केली आहे.

या प्रकरणात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कनाके, राजेश भाऊसाहेब जाधव, महेश दिनकर बारगजे, राजेश रमाकांत ढवण, विजय बाळासाहेब गर्जे, अरुण रामदास शिंपी, वसीम शौकत खान आणि सागर गोविंद रजपूत या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात मागील दीड वर्षात जारी करण्यात आलेली आठ दिव्यांग प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेली तज्ज्ञांची वैद्यकीय तपासणी न करताच ती वितरित करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांचा ओटीपी आवश्यक असतो. या प्रकरणात डॉ. सतीश कनाके यांनी फोन करून संबंधित ओटीपी मिळवला आणि त्यानंतर प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, तपास अद्याप सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे सोलापूरसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related to this topic: