Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची ‘डिजिटल शेतीशाळा’ : 1 एप्रिल रोजी पहिले सत्र

राज्यातील शेतकऱ्यांसाठी “डिजिटल शेतीशाळा” हा अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू करण्यात येत आहे.


हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची ‘डिजिटल शेतीशाळा’  1 एप्रिल रोजी पहिले सत्र

Digital Farming​​​​​​​ |

हिंगोली (Digital Farming) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी “डिजिटल शेतीशाळा” हा अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे पहिले सत्र 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती व मार्गदर्शन मोबाईलद्वारे थेट घरापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या गावातच मोबाईलच्या माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होऊ शकणार आहेत.

सत्र 1 चा विषय : पेरणीपूर्व तंत्रज्ञान

या पहिल्या सत्रात हवामान अनुकूल पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून  यामध्ये बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया आदी विषयांचा समावेश असणार आहे. ही डिजिटल शेतीशाळा युट्यूब (YouTube) माध्यमातून थेट (LIVE) प्रक्षेपित केली जाणार असून शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा),  पाणी फाऊंडेशन,  उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान या अधिकृत चॅनेलवरून सहभागी होऊ शकतात.

राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, कृषीताई, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं सहाय्यता गट तसेच ग्रामीण महिला बचत गट यांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. 

Related to this topic: