डिझेल उपलब्ध करून शेतीची कामे मार्गी लावा; अन्यथा रास्ता रोको — संतोष भुतेकर व सचिन कदम यांचा इशारा

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा मोठा फटका शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना बसत आहे.

डिझेल उपलब्ध करून शेतीची कामे मार्गी लावा; अन्यथा रास्ता रोको — संतोष भुतेकर व सचिन कदम यांचा इशारा

Diesel Shortage

चिखली (Diesel Shortage) : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा मोठा फटका शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना बसत आहे. विशेषतः चिखली व देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा येत्या २५ मे रोजी चिखली-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर व मंडपगावचे सरपंच सचिनभाई कदम यांनी दिला आहे.

सध्या पावसाळा व खरीप पेरणीचे दिवस जवळ आले असून शेतातील नांगरणी, वखरणी व पेरणीची कामे वेगाने सुरू होणे आवश्यक आहे. मात्र डिझेलअभावी अनेक ट्रॅक्टर जागेवरच उभे राहत असून हजारो हेक्टर शेती मशागतीविना पडून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक पेट्रोल पंप चालक प्रशासनाच्या आदेशाचे कारण देत ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत आहेत. परिणामी ट्रॅक्टर घेऊनच पंपावर जावे लागत असून तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे.

ज्या पेट्रोल पंप चालकांनी शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल भरून दिले, त्यांच्यावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रशासनाची ही भूमिका शेतकरीविरोधी असून तातडीने त्यात बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व पेट्रोल पंपांना ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्याचे निर्देश द्यावेत व शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी अंडेरा पोलीस स्टेशन हद्दीत चिखली-जालना महामार्गावर असंख्य ट्रॅक्टरसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतोष पाटील भुतेकर व सचिनभाई कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ५ हजारांची मदत, दुष्काळातील १२ सवलतीही मिळणार!

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ५ हजारांची मदत, दुष्काळातील १२ सवलतीही मिळणार!

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत आणि दुष्काळातील १२ सवलती मिळणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Nov 17, 2026
पाच हजारांच्या दुष्काळी अग्रीम मदतीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे

पाच हजारांच्या दुष्काळी अग्रीम मदतीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे

Chikhli Farmers' Protest: एकीकडे दुष्काळाचे सावट, दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव नाही, उत्पादनात घट, वाढता लागवड खर्च आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटांचा सामना करणारा शेतकरी

Nov 16, 2026
निकृष्ट पांदण रस्त्यामुळे बैलांची खुरे रक्तबंबाळ; जखमी बैलांसह बाळा जगतापांची थेट बीडीओंच्या दालनात धडक!

निकृष्ट पांदण रस्त्यामुळे बैलांची खुरे रक्तबंबाळ; जखमी बैलांसह बाळा जगतापांची थेट बीडीओंच्या दालनात धडक!

नांदपूरच्या निकृष्ट पांदण रस्त्याविरोधात बाळा जगताप यांचे जखमी बैलांसह आंदोलन; ५७ रस्त्यांच्या कामांच्या चौकशीची मागणी.

Nov 16, 2026
मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

Farmers Free Electricity Scheme: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून मोठ्या दिमाखात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपुरा वीजपुरवठा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nov 16, 2026
‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

NCP विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान. शरद पवार, सुनेत्रा पवार, गोकुळ वाद आणि बिश्नोई टोळीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

Nov 10, 2026