Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

अकोला जिल्हा बँक

डॉ. धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; वामनराव देशमुखांचा ४० वर्षांचा सहकार वारसा सुपुत्राकडे

Akola District Bank: डॉ. धीरज देशमुख यांची अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली, त्यांचे पिता वामनराव यांच्या ४० वर्षांच्या सेवेनंतर.


डॉ धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड वामनराव देशमुखांचा ४० वर्षांचा सहकार वारसा सुपुत्राकडे

Akola District Bank |

रिसोड (Akola District Bank) : दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच डॉ. धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि (Akola District Bank) बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांचा वारसा आता त्यांचे सुपुत्र डॉ. धीरज देशमुख पुढे चालवणार आहेत. वामनराव देशमुख हे गेली ४० वर्षे या बँकेचे  उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून कार्यरत होते.

 वामनराव देशमुख यांचे सहकार वर असलेले प्रेम सर्वाशी असलेले ऋणानुबंधन मुळे  डॉ. धीरज यांची अविरोध ही निवड झाली आहे.   वामनराव देशमुख यांनी आपला सहकारातील अनुभव व जबाबदारी मुलाच्या खांद्यावर  दिल्याने सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकारातील ​४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभवाने वामनराव देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात सहकार्याच्या मदतीने बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेले होते. तोच वारसा आता डॉ. देशमुख पुढे चालवणार आहेत. डॉ. धीरज देशमुख यांच्या उमेदवारीला सर्वच गटांतून पाठिंबा मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

​वडिलांप्रमाणेच डॉ. देशमुख देखील शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. ​डॉ. देशमुख यांच्या निवडीमुळे (Akola District Bank) बँकेवर पुन्हा एकदा एका अनुभवी कुटुंबाचे नेतृत्व लाभले आहे. ("वडिलांनी ४० वर्षे ज्या तत्त्वांनी बँकेची सेवा केली, त्याच वाटेवर चालून मी शेतकरी आणि सभासदांच्या हिताचे रक्षण करेन. अनंतराव देशमुख, संतोषकुमार कोरपे आणि सुभाषराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे."
-डॉ. धीरज देशमुख (नवनियुक्त संचालक)

Related to this topic: