Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

DB Squad

रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले


रिसोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची धडक कारवाई दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड : रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले असून, गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच आरोपीला अटक करून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

रिसोड तालुक्यातील गौंढाळा येथील रहिवासी शेषराव गुडदे (वय ६७) यांची ‘एच एफ डीलक्स’ मोटारसायकल (क्रमांक MH 37 N 3882) २१ जून २०२६ रोजी लेहणी फाटा येथून चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी रिसोड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ६३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. पथकाने परिसरात आपले गोपनीय बातमीदार सक्रिय केले. दरम्यान, बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ऋतिक राजू डोंगरे (वय २२, रा. पेनबोरी, ता. रिसोड, जि. वाशिम) या संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेली १५,००० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.

सदर यशस्वी कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील (भापोसे), अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासात पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस हवालदार सुरेश येरमुले, आशिष पाठक, पोलीस अंमलदार रूपेश पडघान, परमेश्वर भोणे, राजेश गांगवे आणि रवी अडागळे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Related to this topic: