Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

DAP Fertilizer

डीएपी खतासाठी दोन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा; दोन दिवसांत २०० मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणार

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी २६ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली.


डीएपी खतासाठी दोन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा दोन दिवसांत २०० मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणार

DAP Fertilizer |

हिंगोली (DAP Fertilizer) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डीएपी खताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी २६ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली.

यावेळी जिल्ह्यात डीएपी खताचा पुरेसा पुरवठा करून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

यानंतर आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सांगितले की, राज्य शासनाकडे सुमारे ४०० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा उपलब्ध असून, त्यापैकी २०० मेट्रिक टन साठा आज किंवा उद्या हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. उर्वरित साठाही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.

आमदार मुटकुळे यांनी जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते व व्यापाऱ्यांना उपलब्ध होणारा डीएपी खतसाठा कोणताही विलंब न करता तातडीने शेतकऱ्यांना विक्री करण्याचे आवाहन केले. पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: