Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलढाणा जिल्हा हादरला; दोन हत्या, अपघातात दोघांचा मृत्यू

गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.


बुलढाणा जिल्हा हादरला दोन हत्या अपघातात दोघांचा मृत्यू

Crime News |

बुलढाणा : गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दोन ठिकाणी कौटुंबिक वादातून महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर एका भीषण अपघातात दोन वॉचमनचा जागीच मृत्यू झाला. सलग घडलेल्या या घटनांमुळे जिल्हाभरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

खामगावात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

खामगाव शहरात घरगुती वादातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सविता प्रकाश सोळंके असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रकाश सोळंके याने तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

भेंडवळमध्ये कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून

दुसरी धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे घडली. येथेही कौटुंबिक वादातून पतीने पत्नी माया भारसाकडे हिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत तिचा खून केला. हल्ला इतका गंभीर होता की तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

खामगावात भरधाव कारची धडक; दोन वॉचमन ठार

दरम्यान, तिसऱ्या घटनेत खामगावातील नांदुरा रोडवरील पुष्पांजली हॉटेलसमोर भरधाव कारने दोन वॉचमनना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गोविंद शेगोकार आणि विवेक पायघन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळीच दोघांनी प्राण गमावले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हाभरात हळहळ आणि भीतीचे वातावरण

एका दिवसात सलग तीन गंभीर घटना घडल्यामुळे बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

Related to this topic: