Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वाशिम वकिल मृत्यू

लेह-लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा जागीच मृत्यू!

Washim Lawyers Death: लेह-लडाख पर्यटनासाठी गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू, या अपघातात रिसोड येथील अँड. कुणाल संतोष चोपडे आणि कारंजा येथील अँड. राघव देशपांडे


लेह-लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा जागीच मृत्यू

Washim Lawyers Death |

 

स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाचा घाला..

रिसोडचे अँड. कुणाल चोपडे अन् कारंजाचे अँड. राघव देशपांडे यांनी गमावला जीव
​संपूर्ण जिल्ह्यात शोककळा; आज मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

रिसोड (Washim Lawyers Death) : लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवार, १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात रिसोड येथील अँड. कुणाल संतोष चोपडे (वय २४) आणि कारंजा येथील अँड. राघव देशपांडे (वय २५) या दोन होतकरू युवकांचा जागीच मृत्यू झाला. नुकतीच लॉ ची पदवी पूर्ण करून बार कौन्सिलची सनद मिळालेल्या या दोन्ही तरुणांवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

लष्कराच्या वाहनाशी झाली बाईकची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी वाशिम जिल्हा आणि परिसरातील आठ युवक लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेले होते. १२ जुलै रोजी हे सर्व मित्र बाईकने प्रवास करत असताना, समोरून येणाऱ्या सैन्य दलाच्या (आर्मी) वाहनाशी त्यांच्या बाईकची जोरदार धडक झाली. हा (Washim Lawyers Death) अपघात इतका भीषण होता की, कुणाल आणि राघव या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मृत कुणाल चोपडे हा दिग्रस नगरपरिषदेचे लेखाधिकारी संतोष चोपडे यांचा मुलगा व पत्रकार सतीश चोपडे यांचा पुतण्या होता. दोन्ही मृत युवकांना नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा कडून वकिलीची सनद प्राप्त झाली होती.

​नेत्यांच्या मध्यस्थीने प्रशासकीय यंत्रणा हलली

रविवार, १२ जुलै रोजी सायंकाळी रिसोड शहरात शुभम खोडके यांच्यामार्फत या अपघाताचे वृत्त समजताच चोपडे व देशपांडे परिवारासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, दुःखाचा वेग आवरून मित्रपरिवाराने लेह येथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. या (Washim Lawyers Death) कठीण प्रसंगी माजी आमदार अँड. विजयराव जाधव यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक दीपक शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अमोल पाटणकर यांनी तात्काळ लेहचे जिल्हा पोलीस अधीक्षक रियाज यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले. तसेच आमदार अमित झनक यांनीही पोलीस अधीक्षक रियाज यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यानंतर पोलीस अधीक्षक रियाज यांनी शुभम खोडके यांच्याकडून माहिती घेत स्थानिक रुग्णालय प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले.

विमानाने मृतदेह आणले महाराष्ट्रात

यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचे स्वीय सहाय्यक प्रतीक सोळुंके यांनी विमान प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यासाठी तातडीने मदत केली. सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी लेह येथे शवविच्छेदन (पोस्टामॉर्टम) व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मंगळवार, १४ जुलै रोजी विमानाने दोन्ही मृतदेह लेहवरून दिल्ली आणि दिल्लीवरून नागपूर येथे आणण्यात आले. नागपूरवरून रुग्णवाहिकेने राघव देशपांडे यांचे पार्थिव कारंजा येथे, तर कुणाल चोपडे यांचे पार्थिव रिसोड येथे आणण्यात आले. आज, मंगळवार १४ जुलै रोजी दोन्ही युवकांवर त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

​नागरिकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; सोशल मीडियावर वृत्त ठेवले गुपित

​अपघाताची (Washim Lawyers Death) बातमी समजताच रिसोड आणि कारंजा येथील नागरिकांनी व पत्रकार बांधवांनी अभूतपूर्व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. अपघात अत्यंत भीषण असूनही, दोन्ही युवकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशीच माहिती त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. आई-वडील आणि कुटुंबाला या धक्क्यातून वाचवण्यासाठी व त्यांचा मानसिक त्रास कमी करण्यासाठी शहरातील एकाही नागरिकाने अपघाताचे फोटो किंवा वृत्त सोशल मीडियावर शेअर केले नाही. तसेच स्थानिक पत्रकारांनीही या संवेदनशील परिस्थितीची जाणीव ठेवून वृत्तपत्रांत बातमी प्रसिद्ध केली नाही. दोन्ही मृतदेह सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत नागरिकांनी पाळलेली ही गुप्तता आणि दाखवलेली सह्यानुभूती सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

Related to this topic: