Breaking News
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना
  • गोकुळ निवडणुकीत ‘हलाल सर्टिफिकेट’चा नवा वाद
  • कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार
  • व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकाऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी- देवेंद्र फडणवीस
  • गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला
  • वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

आशापुरा जिनिंगमध्ये कापसाला आग, शेकडो क्विंटल कापुस जळाला

शहरालगत असलेल्या मांगुर्डा रोडवरील मॉ आशापुरा जिनिंग मधिल कापसाला वाहनाच्या सायलेन्सरमुळे अचानकपणे आग लागली.


आशापुरा जिनिंगमध्ये कापसाला आग शेकडो क्विंटल कापुस जळाला

Cotton Fire |

आग आली लवकरच आटोक्यात

पांढरकवडा (Cotton Fire) : शहरालगत असलेल्या मांगुर्डा रोडवरील मॉ आशापुरा जिनिंग मधिल कापसाला वाहनाच्या सायलेन्सरमुळे अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये जिनिंग मधिल शेकडो क्विंटल कापुस जळाला असुन आग लवकर आटोक्यात आल्याने मोठी हाणी टळली आहे. मांगुर्डा रोडवरील मॉ आशापुरा जिनिंगमध्ये गिमा टेक्स या कंपनीची खाजगी खरेदी सुरु आहे. या कंपनीच्या वतीने हजारो क्विंटल कापुस खरेदी करण्यात आला आहे. त्याची जिनिंग सुध्दा मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातील प्रक्रीया झालेला कापुस सुध्दा इतरत्र पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सद्या जिनिंगमध्ये झोडा (अतिशय हलक्या प्रतिचा) कापुस खरेदी सुरु आहे. २४ रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान कापुस गाडी खाली करीत असतांना गाडीच्या सायलेन्सरमुळे अचानकपणे कापुस खरेदी सुरु असलेल्या ठिकाणी आग लागली. या आगीने अधिक रोद्र रोप धारण केले होते. मात्र जिनिंगमध्ये असलेल्या पाण्याचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच वणी,घाटंजी,राळेगांव,यवतमाळ येथील अग्निशमक दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नाने या आगीवर लवकरच नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठे नुकसान टळले आहे.

Related to this topic: