Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर

Corporator Relatives

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध; आयुक्त अमोल येडगे यांचे स्पष्ट आदेश

महापालिकेच्या कामकाजात निवडून न आलेल्या व्यक्तींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध आयुक्त अमोल येडगे यांचे स्पष्ट आदेश

Corporator Relatives |

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध; आयुक्त अमोल येडगे यांचे स्पष्ट आदेश

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कामकाजात निवडून न आलेल्या व्यक्तींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगरसेवक किंवा नगरसेविकांच्या नातेवाइकांचा महापालिकेतील मुक्त वावर तसेच प्रशासकीय कामकाजातील हस्तक्षेप यावर बंदी घालण्यात आली असून, त्यांचे कोणतेही आदेश अथवा सूचना स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेत काही नगरसेविकांचे पती, दीर, मुलगा आणि जावई हे स्वतःच नगरसेवक असल्याप्रमाणे वावरत असल्याचे प्रकार समोर आले होते. याची गंभीर दखल घेत आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी विशेष परिपत्रक जारी करून अशा हस्तक्षेपाला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले.

परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, महापालिकेच्या कामकाजात सहभागी होणे, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मत मांडणे किंवा अधिकाऱ्यांना सूचना देण्याचा अधिकार केवळ निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच आहे. त्यांच्या नातेवाइकांना अशा प्रकारचा कोणताही अधिकार नाही.

अलीकडच्या काळात काही नातेवाईकांनी समाजमाध्यमांवर नावासमोर 'नगरसेवक' अशी ओळख लावणे तसेच महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये 'झिरो नगरसेवक' म्हणून वावरण्याचे प्रकार वाढल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. १५ जून रोजी मनपा शाळांच्या प्रवेशोत्सवात अनेक नगरसेविकांचे नातेवाईक अशा स्वरूपात सहभागी झाल्याची बाबही चर्चेत आली होती.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, नगरसेविका किंवा नगरसेवकांच्या नातेवाइकांनी स्वतःला लोकप्रतिनिधी समजून कोणतेही आदेश किंवा सूचना देऊ नयेत. त्यांना स्वतःचे काही काम असल्यास त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे महापालिकेत येऊन नियमानुसार कामकाज करावे. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याशी नागरिकांप्रमाणेच नियमांनुसार वागावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

आयुक्तांच्या या आदेशानंतर महापालिकेतील 'झिरो नगरसेवक' संस्कृतीवर कितपत आळा बसतो, की हे आदेश केवळ कागदावरच राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: