Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कोरची नगरपंचायत

कोरचीत विकासकामांचा ‘ब्लॅकआउट’; कोटींच्या कामांचा हिशोब कुठे?”

Korchi Nagar Panchayat: कोरची नगरपंचायतात कोटींच्या विकासकामांचा पारदर्शकता कमी असल्यामुळे नागरिकांनी कामांची माहिती फलकावर देण्यासाठी आग्रह व्यक्त केला आहे.


कोरचीत विकासकामांचा ‘ब्लॅकआउट’ कोटींच्या कामांचा हिशोब कुठे”

Korchi Nagar Panchayat |

 

फलकांशिवाय सुरू कामांवर नागरिकांचा संताप; “हिशोब द्या नाहीतर काम थांबवा” असा इशारा

कोरची (Korchi Nagar Panchayat) : कोरची नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कोटींच्या विकासकामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात रस्ते, नाली, सिमेंट काँक्रीट, इमारत बांधकाम अशी विविध कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही त्या कामांची मूलभूत माहिती नागरिकांपासून लपवली जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट प्रशासनालाच जाब विचारत “माहिती फलक लावा नाहीतर कामे थांबवा” असा आक्रमक इशारा दिला आहे.

माहितीच गायब – पारदर्शकतेवर प्रश्न
नगरपंचायत (Korchi Nagar Panchayat) क्षेत्रातील बहुतांश ठिकाणी कामे सुरू असली तरी त्या ठिकाणी कामाचे नाव, मंजूर निधी, कामाचा कालावधी, कंत्राटदाराचे नाव यासारखी कोणतीही माहिती फलकावर दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, “कोटींच्या कामांचा हिशोब नेमका कुठे लपवला जातोय?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांचा संताप उफाळला

स्थानिक नागरिकांच्या मते, “विकासकामांचा हिशोब फक्त फाईलमध्ये ठेवायचा आणि जनतेपासून लपवायचा, ही पद्धत आता चालणार नाही.” “फलकावर स्पष्ट माहिती दिली तरच कामाची खरी पारदर्शकता दिसेल, अन्यथा हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो.”

कोरचीकरांचा थेट सवाल
कोणत्या योजनेतून निधी आला?
किती खर्च मंजूर झाला आणि किती खर्च झाला?
काम कोणत्या कंत्राटदाराकडे आहे?
काम पूर्ण होण्याची अंतिम तारीख कोणती?


या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.