Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्हा काँग्रेस

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या जंम्बो कार्यकारिणीत शहरी भागावर अन्याय; कार्यकर्त्यांत नाराजी

Hingoli District Congress: काँग्रेसच्या जिल्ह्यादरम्यान कॅबिनेट मॉडेलचा दबदबा सापडत असतानाही हिंगोलीच्या शहरातील पदाधिकारींचा समावेश नकारवण्यात आला आहे.


हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या जंम्बो कार्यकारिणीत शहरी भागावर अन्याय कार्यकर्त्यांत नाराजी

Hingoli District Congress |

हिंगोली (Hingoli District Congress) : यापूर्वी झालेल्या निवडणूकामध्ये काँग्रेसमधील अनेक मातब्बर महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. प्रामुख्याने शिंदेच्या शिवसेनेत अनेक काँग्रेसमधील पदाधिकारी नगर परिषद निवडणूकीमध्ये गेले आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये काँग्रेसची वाटचाल सुरू असताना नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या जंम्बो कार्यकारिणीत शहरी भागातील पदाधिकार्‍यावर अन्याय झाल्याने नाराजीचा सुर उमटत आहे. या कार्यकारिणीत बोटावर मोजण्या इतक्या शहरी भागातील पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे.  

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, गजानन भिमराव देशमुख, बापुराव परसराम गायकवाड, भगवान बाबाराव खंदारे, नंदकुमार लक्ष्मणराव पाटील, शेख महेबूब शेख माजिद, सरचिटणीस प्रकाश प्रल्हादराव वाघ, संतोष विलासराव पोले, शे. जुबेर शे. युनूस मामू, शंकरराव गंगांराम कर्‍हाळे, संतोष किशनराव राजेगोरे,  किसनराव प्रतापराव आडे, बालाजी शंकरराव हांडे, कांतराव अमृतराव शिंदे, राजकुमार मारोतराव पटाईत, किसन नारायण जुमडे,  सचिव बाजीराव शिवरामजी इंगोले, प्रभूअप्पा विश्वनाथआप्पा जिरवणकर, रामकिशन लक्ष्मण धुकसे, विठ्ठलराव लक्ष्मणराव पडघण, कैलास नामदेवराव नायक, दत्ताराव नामाजी मुटकुळे, दिलीपराव बापुजी डुकरे, लक्ष्मणराव कामाजी खोकले अ‍ॅड. इलियास मस्तान नाईक, ज्ञानेश्वर पांडुरंग थोरवे, रविकिरण वाघमारे तर कायम निमंत्रीतमध्ये जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री, लोकसभा, विधानसभेचे उमेदवार, माजी खासदार माजी आमदार, जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेस कमेटी पदाधिकारी, आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, काँग्रेसचे जि.प. आजी, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते यांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. ही कार्यकारिणी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे जाहीर केली आहे. 

विशेष म्हणजे (Hingoli District Congress) काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये शहरी भागातील काही पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला असल्याने शहरी भागातून या निवडलेल्या कार्यकारिणीवर नाराजीचा सूर उमटत आहे. 

अनेकांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसचे पार कंबरडे मोडले
 एकीकाळे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा दबदबा होता. राज्यामध्ये महायुतीचे शासन आल्यानंतर अनेक मातब्बर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी महायुतीमध्ये प्रवेश घेतला. विशेष करून जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी साहेबराव कांबळे यांनी विधान परिषद निवडणूक दरम्यान शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. तर नगर पालिकेच्या निवडणूकीत अ.माबुद बागवान, अनिल नैनवाणी यांच्यासह अनेक मातब्बरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे काँग्रेसचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.

Related to this topic: