Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

समादेशक पदी स्वाती भोर

हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 च्या च्या समादेशक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती

Commissioner Swati Bhor: राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या समादेशक पदी छत्रपती संभाजी नगर लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली


हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 च्या च्या समादेशक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती

Commissioner Swati Bhor |

हिंगोली (Commissioner Swati Bhor) : राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या समादेशक पदी छत्रपती संभाजी नगर लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली एसआरपीएफचे समादेशक पद मागील काही महिन्यापासून रिक्त होते. पौर्णिमा गायकवाड यांची यशदा पुणे येथे प्राध्यापक म्हणुन प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार छत्रपती संभाजी नगर गट १४ चे विक्रम साळी यांच्याकडे 22 जानेवारी रोजी सोपविण्यात आला होता.

परंतु मध्यंतरी त्यांचाही हा पदभार जालना येथील समादेशक उज्वला वनकर यांच्याकडे मागील दिड महिन्यापूर्वी सोपविण्यात आला होता. १५ मे रोजी शासनाच्या गृहविभागाने अनेक उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. ज्यामध्ये (Commissioner Swati Bhor) हिंगोली राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मध्ये स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आता राज्य राखीव पोलिस बलाला कायमस्वरूपी समादेशक मिळणार आहेत.