Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित फेरीस आजपासून सुरुवात

राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीस ६ जूनपासून सुरुवात होत आहे.


इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित फेरीस आजपासून सुरुवात

Class 11 Admission Process 2026-27 |

४.५१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित; राज्यातील १५ हजारांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रक्रिया सुरू

पुणे (Class 11 Admission Process 2026-27) : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीस ६ जूनपासून सुरुवात होत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिर सूचना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्ध केली आहे.

प्रवेश प्रक्रियेनुसार राज्यातील एकूण १५ हजार ७५४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत २२ लाख ५२ हजार २५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत ३ जूनपर्यंत होती. या कालावधीत ४ लाख ५१ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित केला आहे.

संचालनालयाच्या माहितीनुसार, दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती, अर्ज व वेळापत्रकासाठी अधिकृत पोर्टलवर भेट देता येणार असून विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईनची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.