Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > पुणे

पुण्यात अल्पवयीन मुलीं सोबत पुन्हा संतापजनक घटना!'गच्चीवरील पाण्याची टाकी दाखवतो...'आणि केल अश्लील कृत्य

सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दिनेश चौधरी या व्यक्तीने ६ ते १० वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींना आमिष दाखवले.


पुण्यात अल्पवयीन मुलीं सोबत पुन्हा संतापजनक घटनागच्चीवरील पाण्याची टाकी दाखवतोआणि केल अश्लील कृत्य

Child Safety |

१० वर्षीय चिमुरडीच्या धाडसामुळे प्रकार उघड; परिसरात संतापाची लाट

पुणे (Child Safety) : अवघ्या काही दिवसांपूर्वीच, पुण्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

आज पुन्हा, पुण्यातच एका गृहनिर्माण संस्थेमध्ये (हाऊसिंग सोसायटीमध्ये) सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दिनेश चौधरी या व्यक्तीने ६ ते १० वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींना आमिष दाखवले. "मी तुम्हाला इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी दाखवतो," असे सांगून त्याने त्या मुलींना फसवले आणि इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर, या आरोपीने त्या निष्पाप मुलींसोबत लज्जास्पद कृत्य केले आणि बळजबरीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलींमध्ये एका १० वर्षीय चिमुरडीने धाडस दाखवत तात्काळ आपल्या पालकांना संपूर्ण घटना सांगितली. पालकांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी अधिक कठोर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा समाजातील विकृत प्रवृत्तीला आळा बसणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: