Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Child Labour

अन् हिंगोलीत दुकानावर आढळला किशोरवयीन कामगार; गुन्हा दाखल

अनेक ठिकाणी बालकामगार कामावर असल्याच्या तक्रारी समोर येत असताना सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


अन् हिंगोलीत दुकानावर आढळला किशोरवयीन कामगार गुन्हा दाखल

Child Labour |

हिंगोली (Child Labour) : अनेक ठिकाणी बालकामगार कामावर असल्याच्या तक्रारी समोर येत असताना सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर बालकामगार दिनानिमित्त सचित्र वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, १७ जून रोजी रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाजवळील एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये किशोरवयीन कामगार आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकाने दुपारी रेल्वे उड्डाण पुलाजवळील खडकदकर सर्व्हिसिंग सेंटर येथे तपासणी केली. या तपासणीत किशोरवयीन कामगार काम करताना आढळून आला.

या प्रकरणी दुकाने निरीक्षक सुभाष पेरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मोहसीन शेख महेमुद (रा. रिसाला बाजार, हिंगोली) यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील अंभोरे करीत आहेत.

Related to this topic: