Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

अन्नभेसळ प्रतिबंधक पथक

चिखलीत अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाची धडक; स्वीट मार्टमधून नमुने संकलित

Food Adulteration Squad: चिखली येथे अन्नभेसळ पथकाने स्वीट मार्टमध्ये दुग्धजन्य पदार्थांना (दूध, खवा, पनीर इत्यादी) नमुने साठवले आहेत. ह्या तपासणीचा उद्देश असल्यावर अनुकूल मिठाई


चिखलीत अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाची धडक स्वीट मार्टमधून नमुने संकलित

Food Adulteration Squad |

चिखली (Food Adulteration Squad) : चिखली शहरात अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली. बुलढाणा येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही प्रमुख स्वीट मार्ट व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची पाहणी करून विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नभेसळ (Food Adulteration Squad) रोखण्यासाठी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दूध, खवा, पनीर, दही, पेढे तसेच इतर दुग्धजन्य व मिठाई पदार्थांचे नमुने संकलित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागात नवीन प्रशासनिक नेतृत्व आल्यानंतर  (Food Adulteration Squad) भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची चर्चा आहे. पथकाच्या अचानक भेटीमुळे शहरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमक्या किती आस्थापनांची तपासणी करण्यात आली, किती नमुने घेण्यात आले तसेच कोणत्याही आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. तथापि, अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाची ही मोहीम पुढील काळातही सुरू राहण्याची शक्यता असून इतर खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

विशेष: वाढत्या स्वीट मार्टमुळे गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह

चिखली शहरात गेल्या काही वर्षांत स्वीट मार्ट आणि मिठाई विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मात्र या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूध, खवा, पनीर, दही, पेढे यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तयार व विक्री होत असताना अनेकदा ग्रामीण भागातील दूध उत्पादक अथवा दूध विक्रीसाठी येणारे शेतकरी फारसे दिसून येत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
त्यामुळे या पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा स्त्रोत, त्याची गुणवत्ता आणि शुद्धता याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दुग्धजन्य पदार्थांची नियमित तपासणी होणे आवश्यक असून याच (Food Adulteration Squad) अनुषंगाने अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाचे विशेष लक्ष या क्षेत्राकडे असल्याचे समजते. अर्थात, कोणत्याही व्यावसायिक अथवा आस्थापनाविरुद्ध ठोस पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी प्रयोगशाळेच्या अहवालातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणी अहवालाकडे व्यापारी, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.