Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

‘Biryani Is Dinner, Not Consent’; व्हायरल नोटिफिकेशनवर Zomato चे स्पष्टीकरण, मुंबई पोलिसांचीही जनजागृती

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘Biryani Is Dinner, Not Consent’ या मोहिमेमुळे संमती (Consent) या विषयावर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


‘biryani is dinner not consent’ व्हायरल नोटिफिकेशनवर zomato चे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांचीही जनजागृती

Chicken Biryani Row |

मुंबई (Chicken Biryani Row) : सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘Biryani Is Dinner, Not Consent’ या मोहिमेमुळे संमती (Consent) या विषयावर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका स्टँड-अप कॉमेडी शोमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादात आता Zomato आणि मुंबई पोलीस यांनीही हस्तक्षेप करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात जून 2026 च्या सुरुवातीला झाली. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रेक्षकांशी संवाद साधताना गुरुग्राममधील 23 वर्षीय वेब डेव्हलपर हिमांशू जांग्रा याने आपल्या डेटसाठी 370 रुपयांची चिकन बिर्याणी घेतल्यामुळे त्या खर्चाच्या बदल्यात शारीरिक जवळीक मिळण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे वक्तव्य केले. या विधानावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

वाद वाढत गेल्यानंतर संबंधित तरुणाला एका डिझाईन फर्ममधील नोकरी गमवावी लागली. तसेच, या घटनेनंतर प्रणित मोरे यांनी सार्वजनिक माफी मागत आपले इन्स्टाग्राम खातेही निष्क्रिय केले.

दरम्यान, ‘Biryani Is Dinner, Not Consent’ हा संदेश सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना काही जणांनी Zomato च्या नावाने बनावट नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट तयार करून प्रसारित केला. त्या बनावट संदेशात, “BIRYANI BHEJDU? 370 KI HAI BAS?” (बिर्याणी पाठवू का? फक्त 370 रुपयांची आहे) असा मजकूर दाखवण्यात आला होता.

या प्रकरणामुळे ब्रँडची प्रतिमा खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन Zomato ने तातडीने स्पष्टीकरण जारी केले. कंपनीने काळ्या पार्श्वभूमीवरील अधिकृत पोस्ट प्रसिद्ध करत स्पष्ट केले की, “बिर्याणी म्हणजे जेवण आहे, संमती नाही. आमच्या नावाने फिरत असलेला आक्षेपार्ह नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट पूर्णपणे बनावट आहे. तो आम्ही तयार केलेला किंवा पाठवलेला नाही.

या चर्चेचा उपयोग जनजागृतीसाठी करत मुंबई पोलिसांनी देखील सोशल मीडियावर एक विशेष संदेश प्रसारित केला. पोलिसांनी ‘₹370’ या आकड्यातील शून्याच्या जागी बिर्याणीचे ताट दाखवत एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमध्ये पोलिसांनी स्पष्ट इशारा देत म्हटले, “₹370 मध्ये तुम्हाला एक प्लेट बिर्याणी मिळू शकते. मात्र आमच्या लॉकअपमध्ये अधिक काळ राहिल्यास मोफत जेवण मिळेल. #BiryaniIsNotConsent”

मुंबई पोलिसांच्या या संदेशाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून संमतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Related to this topic: