Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा: सलग पाचव्या वर्षी CBSE बोर्डात 100% निकाल; गुणवत्तेची परंपरा कायम


स्व माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा सलग पाचव्या वर्षी cbse बोर्डात 100 निकाल गुणवत्तेची परंपरा कायम

CBSE Results |

रिसोड (CBSE Results) : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्टता सिद्ध करत स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा यांनी यंदाही CBSE बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल मिळवून सलग पाचव्या वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेचे नाव परिसरात अभिमानाने घेतले जात आहे.

या वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करत उत्तीर्णतेची शंभर टक्के नोंद केली. काही विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत उच्च गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेचा गौरव वाढवला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, आणि वैयक्तिक लक्ष यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले.

शाळेचे प्राचार्य म्हणाले की, “आमचा भर केवळ निकालावर नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, आणि मूल्याधारित शिक्षण यामुळेच हा यशस्वी निकाल शक्य झाला.”

या निकालामध्ये खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
1- मेहुल बगडिया - 98.20%
2- श्रिया हवा - 95.40%
3- अक्षद खानझोडे - 94%
4- तेजल छित्तरका- 93.60%
5- कृष्णा अग्रवाल - 92%
6- प्रतिक जायभाये - 91%
7- श्रावणी सरकटे - 90.80%
8-आदित्य बबेरवाल - 90.60%
9- श्रद्धा खानझोडे - 90.60%
10- अर्णव मेश्राम - 90.60%
11- अथर्व पारीख - 90%
12- विराज देशमुख - 90%

44 विद्यार्थ्यांपैकी
90% च्या वर - 12 विद्यार्थी
80% ते  89% पर्यंत- 14 विद्यार्थी
70% ते 79% पर्यंत - 13 विद्यार्थी

Related to this topic: