मलकापूर येथील नामांकित स्व. श्री. सरदारमलजी मोहनलालजी संचेती एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) शाळेतील इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
मलकापूर (CBSE Result 2026) : मलकापूर येथील नामांकित स्व. श्री. सरदारमलजी मोहनलालजी संचेती एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) शाळेतील इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय व घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्थिनी कु. मनस्वी मुकेश केला हिने ९३.८% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला तसेच सियल मनोज पारख हिने ९२.४% गुण मिळवून द्वितीय तर अक्षदा पंकज रुणवाल आणि आदित्य उमेश पाटील या दोघांनी ९२.२% गुण प्राप्त करून विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवण्याचा मान प्राप्त केला.
तसेच सानवी बाळू सुरवाडे (९१.८%), ज्ञानिका विजय जैस्वाल(९१.४%), अथर्व दीपक खाडपे (९१%), लावण्या प्रमोद वराडे (९०.४%), स्तुती हेमंत रेदासनी (८९.२%), फहीज उद्दीन ख्वाजा (८९.२%), जानवी श्रीकांत खर्चे (८८%), अमेय दत्तनिवास नारखेडे (८७.४%), ऋतिक रमेश काळे (८६%), रुचिका निलेश अग्रवाल (८५.६%), उन्नती उमेशकुमार चोपडा (८४.४%), सिमरन केशव मुकुंद (८४.२%), नेतल गणेश अग्रवाल (८३.२%), रोशन कमलेशकुमार पंजवानी (८२.२%), अनुराग अनंतकुमार खर्चे (८२%), हुमा कौसर मोहम्मद अन्वर (८१.८%), रिदम पीयूष अग्रवाल (८१.४%), मुशाहिद अशरखान आसिफ खान (८१%), सागर गोकुळ सिंग इंगळे (८०.६%), इन्शारह सहिरीश झबीउल्लाह शाह (८०.४%), नैतिक योगेशकुमार चौधरी (८०.४%) आणि प्रथमेश उमेश एकडे (८०%) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल मिळवत शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उल्हास कुमार संचेती सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाशकुमार संचेती सर, संचालक श्री. विमलकुमार संचेती सर, संस्थेचे सचिव ॲड. श्री. अमरकुमार संचेती सर, सहसचिव श्री. निलेश विनोदकुमार संचेती सर, श्री. दीपककुमार दाकलिया सर, इंजि. सौ. ममता संचेती मॅम, श्री. नवीन संचेती सर, श्री. संतोष संचेती सर, श्री. विनोद विमलचंदजी पारख सर, श्री. लोकेश महेंद्र कुमार संचेती सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुदीप्ता सरकार मॅम तसेच शाळेच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.