Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

सीबीआयच्या रडारवर आता पालक; नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पेपर कसा फुटला याची चौकशी करताना अनेक क्लासेस आणि खाजगी इसमांची चौकशी केली आहे.


सीबीआयच्या रडारवर आता पालक नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत

CBI Investigation |

नांदेड (CBI Investigation) : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पेपर कसा फुटला याची चौकशी करताना अनेक क्लासेस आणि खाजगी इसमांची चौकशी केली आहे. या प्रकरणात प्राध्यापक कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सीबीआयने आपला मोर्चा थेट पालकांकडे वळवल्याचे दिसत आहे.

फुटलेला पेपर ज्यांनी विकत घेतला, अशांची माहिती सीबीआयकडे प्राप्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच अनुषंगाने सीबीआयने नांदेडमधील विद्युतनगर येथील कदम यांच्याकडे चौकशी केली आहे. कदम यांनी एकूण पाच लाख रुपये देऊन हा पेपर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचे पथक परत गेले. या कारवाईमुळे मात्र संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Related to this topic: