Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

बोगस खत खरेदी

बोगस खरेदी खताद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तलाठ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

Buying bogus fertilizer: शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन बोगस व बनावट खरेदीखताच्या आधारे बेकायदेशीररीत्या फेरफार करून जमीन हडप करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


बोगस खरेदी खताद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न तलाठ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Buying bogus fertilizer |

 

वडिलोपार्जित ७/१२ उताऱ्यात फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस!

शिरूर अनंतपाळ (Buying bogus fertilizer) : येथील एका शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन बोगस व बनावट खरेदीखताच्या आधारे बेकायदेशीररीत्या फेरफार करून जमीन हडप करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तलाठयासह  एकूण तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल संजिव व्यंजने वय ३३ वर्षे, रा. शिरुर अनंतपाळ यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तलाठी, मंडळअधिकारी,यांच्यासह अन्य एका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपी शासकीय कर्मचारी असून, आरोपींनी संगनमत करून शासकीय रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस आले आहे.

फिर्यादी व्यंजने यांच्या मौजे शिरुर अनंतपाळ येथील जमीन गट क्र. १४/१४/ ब मध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सन २००१ मध्ये झालेल्या तोंडी वाटणीनुसार कायदेशीररीत्या महसुली रेकॉर्डवर फेरफार क्रमांक ३०३७ अन्वये क्षेत्र ०१ हेक्टर ११ आर अशी नोंद फिर्यादीच्या वडिलांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे करण्यात आली होती. या (Buying bogus fertilizer) नोंदीला व वाटणीपत्राला आजवर कोणाचीही हरकत नव्हती.

असे असताना, आरोपींनी आपसात संगनमत करून २००१ मधील एका जुन्या व बेकायदेशीर खरेदीखताचा आधार घेतला, ज्याची मुदत केव्हाच संपुष्टात आली होती आणि जे सक्षम न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. हे माहित असतानाही, आरोपींनी सन २०२५ पर्यंत सदर खरेदीखत महसूल दप्तरी दाखल न करता अचानक फेरफार क्र. ७१५२ मंजुरीसाठी घेतला. शासकीय पदाचा व इलेक्ट्रॉनिक संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून, कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत फिर्यादीच्या नावावरील क्षेत्र कमी करून आरोपींच्या नावाची बेकायदेशीर नोंद घेण्यात आली. 

या (Buying bogus fertilizer) बेकायदेशीर फेरफाराबाबत फिर्यादीने जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार शिरुर अनंतपाळ यांनी केलेल्या चौकशीत तलाठी आरोपी क्र. १ यांनी कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि खोटे रेकॉर्ड तयार करून गुन्ह्याचे समर्थन केल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशी अहवालात दोषी आढळल्यानंतर अखेर हा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर अनंतपाळ पोलिसांनी या प्रकरणी भा.न्या.सं. २०२३ च्या कलम २०१, २५५, २५६, २५७, २५८, २५९, ३१६(१), ३१८, ३३६(१), ३३७, आणि ३३८ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.